वाढत्या आयातीमुळे परकीय व्यापारातील तूट फुगली

नवी दिल्ली – जानेवारीमध्ये आयात-निर्यातीतील तूट 14.73 अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. व्यापार तुटीने डिसेंबरमध्ये गेल्या 10 महिन्यांचा तळ नोंदविला होता. 2018 च्या अखेरच्या महिन्यात व्यापार तूट 13.08 अब्ज डॉलर झाली होती.
वाढत्या आयातीपोटी देशातील व्यापार तूट 2019 च्या सुरुवातीलाच वाढली आहे.

जागतिक मंदीमुळे जागतिक व्यापार कमी होत असल्यामुळे भारताला निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. देशाची आयात वर्षारंभी 41.09 अब्ज डॉलर झाली असून ती आधीच्या 41.01 अब्ज डॉलर तुलनेत यंदा किरकोळ वाढली आहे. वर्षभरापूर्वी, याच कालावधीत ती 41.08 अब्ज डॉलर होती. भारताची तेल आयात 3.59 टक्‍क्‍याने कमी होत 11.24 अब्ज डॉलर नोंदली गेली आहे.

-Ads-

जानेवारी 2018 मध्ये ती 11.09 होती. यंदाच्या जानेवारीत खनिज तेलाच्या किमती 14.09 टक्‍क्‍यांनी घसरल्या आहेत. तर एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान तेल आयात 36.65 टक्‍क्‍यांनी वाढून 119.34 अब्ज डॉलर झाली आहे.
जानेवारीमध्ये निर्यात वाढून 26.36 अब्ज डॉलर झाली आहे.

ती जानेवारी 2018 मधील 25.41 अब्ज डॉलरपेक्षा यंदा वाढली असली तरी डिसेंबर 2018 मधील 27.93 अब्ज डॉलरच्या तुलनेत कमी आहे. गेल्या महिन्यात सोने आयात 38 टक्‍क्‍यांनी उंचावत 2.3 अब्ज डॉलर झाली आहे. तर रत्ने व दागिने निर्यात 6.67 टक्‍क्‍यांनी वाढून 3.24 अब्ज डॉलर झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)