नागपूर: महाविद्यालयांत भगवतगीतेच्या वाटपावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपाला चांगलेच घेरले. माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, साऱ्या महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्राचा बोजवारा उडालेला असताना सरकार अशा वादग्रस्त गोष्टी मुद्दाम करते आहे. आम्ही भगवतगीतेच्या विरोधात नाही, मात्र महाविद्यालयांत धार्मिक ग्रंथ वाटण्याची चुकीची प्रथा सरकारने पाडू नये.

सरकारतर्फे महाविद्यालयांमध्ये धार्मिक ग्रंथ वाटण्याचे प्रकार महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, विकासाच्या वाटेने जाता न आल्याने सरकार असे उद्योग करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

1. महाविद्यालयांत भगवतगीता वाटण्याच्या सरकारच्या निर्णयाचा उद्देश काय?
2.  केवळ A ग्रेड असणाऱ्या कॉलेजनाच भगवतगीता का वाटण्यात आली?
3. भगवगीतेसोबत गुरुग्रंथसाहेब, कुराण आणि इतर धार्मिक ग्रंथ का देण्यात आले नाहीत?
4. फक्त भगवतगीता देण्याचा निर्णय कोणत्या तर्काने ठरवला गेला?
5. शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का?
6. यापुढील काळात बक्षीस म्हणून सरकार भगवतगीताच देणार आहे का?
7. सत्तेत आल्यानंतर आत्तापर्यंत सरकारने महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात कोणते आमूलाग्र बदल घडवून आणले?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)