सुधारणामुळे स्थूल अर्थव्यवस्था भक्‍कम: उर्जित पटेल 

जीएसटी, दिवाळखोरी कायद्याचे दूरगामी सकारात्मक परिणाम 

मुंबई: केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात केलेल्या तीन आर्थिक सुधारणामुळे अर्थव्यवस्था भक्‍कम होण्यास मदत मिळणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, सरकारने रिझर्व्ह बॅकेबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करून बॅंकेला महागाईचा योग्य दर ठरविण्याचेअधिकार दिले आहेत. वसूल न होणाऱ्या कर्जाच्या वसुलीसाठी दिवाळखोरी आणि नादारी कायदा आणला आहे. त्याचबरोबर जीएसटी कायद्याची अंमलबजावणी केली आहे. यामुळे भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले. एका शिक्षण संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलताना ते म्हणाले की, यामुळे विविध क्षेत्रात दीर्घ पल्ल्यात चांगले काम होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अर्थतज्ज्ञाचे काम कधी आर्थिक पेचप्रसंग निर्माण होणार आहे किंवा मंदी कधी येणार आहे, याबाबत भविष्यवाणी करण्याचे नाही तर लोक आर्थिक व्यवहार करताना कसे वागतात याची कारणमीमांसा करण्याचे आहे, असे पटेल यांनी सांगितले. 2008 मध्ये जागतिक आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला ते हा अर्थतज्ज्ञांना याचा अंदाज न आल्याबद्दल अर्थतज्ज्ञावर टीका होत असते. तशी टीका अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, नियमित कामकाज, लोक आर्थिक व्यवहार कसे करतात. ते योग्य पद्धतीने कसे केले जाऊ शकतील. तसे न केल्यास काय अडचणी येतात. अडचणी आल्यास त्या कशा सोडविल्या जाऊ शकतात याकडे अर्थतज्ज्ञानी लक्ष देणे अपेक्षित आहे. डॉक्‍टर रोग बरा करू शकतात. मात्र तो रोग कधी येणार आहे याची भविष्यवाणी ते करू शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले.

अर्थतज्ज्ञ रोजच्या घडामोडीवर भाष्य करीत असतात. त्यातून वित्तीय संस्था, सरकार, कंपन्या आपले अर्थ काढून आपले धोरण तयार करीत असतात. त्याचबरोबर त्यांच्या काही वक्‍तव्यावर टीका होते. तसेच त्यांच्या विचाराला विरोध होतो. मात्र तरीही ते आपले काम करीत असतात. अनेक अर्थतज्ज्ञांनी मांडलेले विचार त्यांच्या हयातीत ओळखले गेले नाहीत. मात्र नंतर त्याचे गुणगान केले गेले असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, अमेरिकन अर्थतज्ज्ञ हेमॅन मिन्की यांनी केलेल्या कामाची 1996 पर्यंत कोणी दखल घेतली नाही. मात्र, 2008 च्या मंदीनंतर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)