व्यावसायिकांचा आशावाद वाढला 

नवी दिल्ली: गेल्या वर्षाच्या तुलनेत उद्योग क्षेत्रासाठी असणाऱ्या व्यवसाय आशावाद निर्देशांकात जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी 11.7 टक्‍क्‍यांनी वाढ झाली. दि डन ऍण्ड ब्रॅडस्ट्रीड कम्पोझिट बिझनेस ऑप्टिमिझम इंडेक्‍स सप्टेंबर तिमाहीसाठी 8.6 वर पोहोचला आहे. गेल्या वर्षी जीएसटी लागू करण्यात आणि नोटाबंदीच्या परिणामाने जुलै-सप्टेंबर 2017 दरम्यान घसरण झाली होती. गेल्या वर्षाच्या समान तिमाहीचा विचार करता सप्टेंबर तिमाहीत उद्योगक्षेत्रात आशावाद दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संकेत आणि देशांतर्गत व्यवसायामुळे सप्टेंबर तिमाहीत यात घसरण झाली आहे, असे सांगण्यात आले. एनपीएची वाढती समस्या, महागाईचा धोका, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमजोर रुपया आणि व्याजदरात वाढ होण्याची शक्‍यता असल्याने या निर्देशांक घसरला आहे असे डन ऍण्ड बॅडस्ट्रीट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सिन्हा यांनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)