विक्री थंडावल्याने वाहनांचा साठा वाढला

नवी दिल्ली – डिलरकडून होणाऱ्या वाहनांच्या विक्रीत फेब्रुवारी महिन्यात आठ टक्‍क्‍यांची घट झाली आहे. त्यामुळे दुचाकीसह बरीच वाहने आता डिलरकडे पडून असल्याचे दिसून येत आहे.

वाहन डिलर संघटनेने जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात डिलरकडून केवळ 2,15,276 एवढी वाहने विकली गेली. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 2,34,632 वाहने विकली गेली होती. त्याचबरोबर दुचाकीची विक्री 7.97 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 11 25405 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी 122883 एवढ्या दुचाकी विकल्या गेल्या होत्या.

प्रवासी वाहनांपेक्षा दुचाकीचा साठा डिलरकडे मोठ्या प्रमाणात पडून आहे. काही डिलरकडे तर शंभर दिवस पुरेल एवढा साठा पडून आहे. त्यामुळे डिलरचे मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडले आहे, ही चिंतेची बाब असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

या महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 7.08%, तीनचाकी वाहनांच्या विक्रीत 10.32% तर एकूण वाहन विक्रीत 8.06 टक्‍के एवढी घट झाली आहे. या महिन्यात घाऊक पातळीवरील विक्री 1.8 टक्‍क्‍यांनी कमी झाली असल्याचे गेल्या आठवड्यात वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना असलेल्या सिआमने सांगितले होते. त्यामुळे या वर्षी एकूण वाहन विक्री सहा टक्‍के तरी वाढेल का याबाबत शंका निर्माण झाल्या आहेत.

“गेल्या सहा महिन्यांपासून प्रवासी वाहन आणि दुचाकीची विक्री कमी होत आहे. विम्याचा खर्च वाढलेला आहे. त्याचबरोबर भांडवल सुलभता आणखी कायम आहे. या आणि इतर कारणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून वाहनांची विक्री अपेक्षेइतकी होत नाही. त्यामुळे डिलरकडे बरीच वाहने पडून आहेत.
– आशिष हंसराज काळे, अध्यक्ष, वाहन डिलर संघटना

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)