यंत्र वापरामुळे शेती झाली गतिमान

कर्जत: भारतासारख्या देशात आजही सत्तर टक्के लोकसंख्या ही शेतीवरच अवलंबून आहे. पूर्वी शेतातील सर्व कामे मजुरांच्या आणि जड कामे ही बैलाच्या सहाय्याने केली जात होती. मात्र आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीने शेतातील सर्व कामे ही यंत्राच्या सहाय्याने होऊ लागली आहे. ट्रॅक्‍टरबरोबरच मळणीयंत्रांना शेतकऱ्यांकडून पसंती दिली जात असल्याने कमी वेळेत कामे पूर्ण करुन घेणे शक्‍य झाले आहे. कर्जत तालुक्‍यात सध्या मशिनच्या सहायाने गहू काढणीच्या कामाला वेग आला आहे.

शेतकरी खरीप व रब्बी पिकांचे उत्पन्न घेताना नांगरणी, पेरणी, डवरणी, काढणी, मळणी यासारखी कामे यंत्रांच्या सहायाने करीत आहेत. मळणीयंत्र गावागावात सहजतेने उपलब्ध होत असल्याने शेतकरी आणि बैलाचे श्रम कमी झाले आहेत. मका, गहू, हरभरा आदिंची काढणी करण्यासाठी मळणीयंत्राचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यंत्राच्या उपयोगाने शेतकऱ्यांचे पीक लवकरात लवकर घरी येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)