दुबईस्थित व्यावसायिकाला सोने तस्करीबद्दल अटक

मुंबई: सोने तस्करी आणि मनी लॉण्डरिंग रॅकेटचा सूत्रधार असणाऱ्या दुबईस्थित भारतीय व्यावसायिकाला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतले.

डीआरआयच्या जाळ्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव उघड करण्यात आलेले नाही. तो दुबईत कपड्यांचा व्यवसाय करतो. मागील वर्षी ऑगस्टमध्ये डीआरआयने दिल्ली विमानतळावर परकी चलनाच्या तस्करीबद्दल चार भारतीयांना अटक केली. त्यातील तिघे सोने तस्करी आणि मनी लॉण्डरिंग रॅकेटचा भाग असल्याचे तपासातून उघड झाले. त्यांच्या चौकशीतून दुबईस्थित भारतीय व्यावसायिकाचे कारनामे पुढे आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधित टोळी भारतातून दुबईत परकी चलनाची तस्करी करते. त्या टोळीचे सदस्य भारतात परतताना सोने तस्करी करतात, असे तपासातून निष्पन्न झाले. त्या टोळीने मागील वर्षाच्या मे ते ऑगस्ट या कालावधीत तब्बल 21 कोटी रूपयांच्या 70 किलो सोन्याची तस्करी केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्या टोळीशी संबंधित काळा पैसा आणि मनी लॉण्डरिंग यासंदर्भात डीआरआयकडून चौकशी हाती घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)