#व्हिडीओ: पहा मद्यधुंद पीएमपीएल चालकाची ‘संतोष माने’ स्टाईल ड्राइव्हिंग! थोडक्यात बचावले प्रवाशी

संदीप कापडे/पुणे: सुरक्षित प्रवासाची जाहिरातबाजी करणाऱ्या पीएमपीएल बसेस खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल आज कात्रज कडून कोथरूड कडे निघालेल्या पीएमपीएल प्रवाशांना नक्कीच पडला असेल. कोथरूड डेपोची बस क्रमांक एमएच १४ सीडब्ल्यू १६७२ घेऊन चालक चंद्रशेखर आहिरे कात्रजवरून कोथरूड कडे निघाला होता. सदर बसमध्ये यावेळी जवळपास ४० प्रवासी प्रवास करत होते. बस सुरु झाल्यानंतर चालक चंद्रशेखर अहिरे याचा बसवरील ताबा सुटत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले मात्र प्रथम प्रवाशांनी याकडे कानाडोळा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जशी जशी बस पुढे जाऊ लागली तसतसे अहिरे हा जास्तच बेफिकीरपणे गाडी चालवू लागला. बसचा दोन वेळा अपघात होता होता राहिल्याने प्रवाशांनी भीतीपोटी बस पद्मावती जवळ थांबवली व चालक आहिरे यास जाब विचारला, जाब विचारात असताना प्रवाशांच्या लक्षात आले की सदर चालकाने मद्यपान केलेले असल्याने अक्षरशः त्याच्या तोंडातून शब्द देखील फुटत नव्हते. सदर चालक दारूच्या नशेत असल्याने तो जाब विचारणाऱ्या प्रवाशांवर अरेरावी करण्याचा प्रयत्न करू लागला, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी बोलावून घेतले. प्रवाशांच्या तक्रारीला त्वरित प्रतिसाद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल दरेकर घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दारूच्या नशेत असणाऱ्या चंद्रशेखर अहिरेला ताब्यात घेतले.

काही वर्षांपूर्वी एसटी बसचालक संतोष माने यानी वेडाच्या भरात रस्त्यावरून पायी चालणाऱ्या सामान्य नागरिकांना अक्षरशः आपल्या बस खाली चिरडले होते. त्या घटनेचे व्रण पुणेकरांच्या मनामध्ये अजूनही ताजे असतानाच आजची ही घटना पीएमपीएल प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करते. संतोष मानेच्या गंभीर घटनेनंतर देखील प्रशासन अजूनही प्रवाशांच्या सुरक्षिततेला दुय्यम स्थान देत असल्याचे या घटनेद्वारे अधोरेखित होते.

 

प्रभात इफेक्ट: ‘त्या’ मद्यधुंद चालकाची पीएमपी कडून हकालपट्टी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)