पंजाब : औषध परवाना रद्द केल्याने महिला अधिकाऱ्याची कार्यालयात घुसून हत्या

पंजाब – पंजाब आरोग्य विभागात काम करणाऱ्या औषध परवाना अधिकारी नेहा शौरी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पंजाबमधील खरड येथे शुक्रवारी घडली. तसेच हत्या करून हल्लेखोराने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली. डॉ. नेहा शौरी असे हत्या झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.

नेहा यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीची ओळख पटली असून बलविंदर सिंह असे त्याचे नाव आहे. 2009 साली बलविंदर सिंह याच्या औषधांच्या दुकानावर नेहा यांनी छापा टाकला होता. या छाप्यात नशेची औषधे आढळल्याने त्याचा परवाना रद्द केला होता. त्याचाच बदला घेण्यासाठी आरोपीने हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

नेहा यांच्या ऑफिसबाहेर असणाऱ्या चौकीदाराला गुंगारा देत बलविंदर सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ऑफिसात शिरला. बॅगेत लपवून आणलेल्या रिव्हॉलवरनं त्यानं नेहावर तीन गोळ्या झाडल्या. गोळीबार करून बलविंदर पळून जात असताना नागरिकांनी त्याला घेरले. त्यावेळी त्याने स्वत:वर गोळी झाडून घेत स्वत:ला संपवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)