मादक पदार्थांचे सेवन टाळायला हवे (भाग २) 

डॉ. श्‍याम अष्टेकर

तरुणांमध्ये मादक पदार्थाच्या व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. या प्रमाणामध्ये वाढ होण्यासोबतच तरुण वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराकडे कानाडोळा करत आहेत. 16 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांना मादक पदार्थाचे व्यसन असून या प्रमाणामध्ये 10 टक्क्‌यांनी वाढ होत आहे. आज तरुणांवर परिणाम करणारी वाईट गोष्ट म्हणजे मादक पदार्थाचे व्यसन. 

मादक पदार्थांचे सेवन टाळायला हवे (भाग १)

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहे सर्वेक्षणाचा अहवाल? 
तरुणांमध्ये मादक पदार्थाच्या व्यसनाचे प्रमाण वाढतच आहे. या प्रमाणामध्ये वाढ होण्यासोबतच तरुण वैद्यकीय सल्ला किंवा उपचाराकडे कानाडोळा करत आहेत. 16 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांना मादक पदार्थाचे व्यसन असून या प्रमाणामध्ये 10 टक्क्‌यांनी वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोच्या शहर-निहाय माहितीमधून समोर आले की, 2018 मध्ये देशात  नार्काटिक ड्रग्ज ऍण्ड सायकाट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्‍ट अंतर्गत 19,874 केसेसची नोंद झाली. त्यावरुन मुंबई शहरामध्ये मादक पदार्थाचे सेवन करण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून येते. भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 15 ते 19 वर्षे वयोगटातील 28.6 टक्के मुलांना तंबाखू खाण्याचे आणि 15 टक्के मुलांना मद्यपान करण्याचे व्यसन असल्याचे दिसून आले. 15 ते 19 वर्षे वयोगटातील 5.5 टक्के मुलींना तंबाखू खाण्याचे आणि 4 टक्के मुलींना मद्यपान करण्याचे व्यसन असल्याचे दिसून आले. सामाजिक संबंधाचा अभाव, वेगळेपणाची भावना आणि सपोर्ट सिस्टमचे अपयश हे याकरिता कारणीभूत घटक आहेत. कामात व्यस्त असलेले, तसेच विभक्त पालकांची किशोरवयीन मुले, व्यक्तिमत्त्व डिस्ऑर्डर्स असलेली किशोरवयीन मुले सर्वात असुरक्षित आहेत. तसेच तणावग्रस्त जीवन, जैविक दुर्बलता, आनुवांशिक आजार व मानसिक आजारापासून पीडित मुलांनासुद्धा असुरक्षिततेचा उच्च धोका आहे. सामान्यपणे दिसण्यात येणारे मादक पदार्थ आहेत दारू, तंबाखू व भांग, ड्रग्जचे एम्फेटामिन्स ग्रुप, हेरॉईन, इन्हेलंट्‌स व इंजेक्‍टेबल पदार्थ. अनेकजण कोकेन, अफू व एलएसडीचेसुद्धा सेवन करतात. सहका-यांमध्ये इम्प्रेशन पाडण्यासाठी या मादक पदार्थाचा सेवन करण्याचा प्रयत्न’ करतात.

बहुतेक किशोरवयीन मुले वाईट मित्रांच्या सोबतीमुळे मादक पदार्थाचे सेवन करत आहेत. पाहणीत सहभागी झालेल्यांनी सांगितले की, सहकाऱ्यांचा दबाव आणि तणाव, या पदार्थाबाबत असलेली कुतूहलता व नैराश्‍यामुळे मादक पदार्थाचे व्यसन करण्यास सुरुवात होते. समाजात आपली प्रतिष्ठा दाखवण्याकरिता व्यसनाला सुरुवात होते आणि हळूहळू याची सवय होऊन जाते. मादक पदार्थ सहजपणे उपलब्ध होणे, योग्य प्रतिबंधाचा अभाव, कायद्याच्या अंमलबजावणीचा अभाव आणि आर्थिक उपलब्धता या देखील समस्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)