दुष्काळामुळे डांळिब शेतकरी अडचणीत

बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ

बिदाल  – माण तालुक्‍यातील बिदाल, आंधळी, मलवडी, टाकेवाडी, पाचवड, वावहिरे, रांणद, दहिवडी, गोंदवले, पिगंळी येथील शेतकऱ्यांनी आपला कल डाळिंब उत्पादनाकडे वळवला. पण, पाणी व तेल्या रोगाच्या संकटामुळे पिक क्षेत्र कमी होत असल्यामुळे डाळिंब छाटणीवर मोठ्या प्रमाणावर मजूरांना रोजगार मिळत नाही. डाळिंबबागेच्या लागवडीचा खर्च अधिक असला, तरी ठोक उत्पन्न देणारे हे पीक असल्याने गेल्या एका वर्षांमध्ये डाळिंब लागवडीकडे शेतकऱ्यांचा कमी झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र, निसर्गाची अवकृपा होत राहिल्याने डाळिंब बागायतदारांपुढे पाण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या लागवडीपासून ते फळे लागेपर्यंत लाखो रुपये खर्च करावे लागतात. परंतु, दुष्काळाचा फटका बसून बागांना गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात पाणी न मिळण्यामुळे यंदाच्या हंगामात फळधारणा झाली नाही. काही शेतकऱ्यांच्या बागांना यंदाच्या हंगामात प्रारंभी फळे लागले. मात्र, ऐन वाढीच्या अवस्थेतच पाणी न मिळाल्याने डाळिंबचे फळे अक्षरश: सुकून गेले.

डाळिंब बागा कशा जगवायच्या या चिंतेने ग्रासलेल्या शेतकऱ्यांपुढे त्यांना कुऱ्हाड लावणे हाच अंतिम पर्याय डोळ्यासमोर दिसत आहे. विकास सेवा सोसायटी, जिल्हा बॅंक, नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेऊन शेतकऱ्यांनी डाळिंबबागांची जपणूक केली आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. डाळिंब पिकांमुळे औषध दुकानादार, डाळिंब छाटणी कामगार, खुरूपणीसाठी महिला व अन्य कामासाठी मजूरांचाही उदरनिर्वाह सुरू होता. पण पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकरी व मजूरही अडचणीत सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)