जुन्नर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात दुष्काळ स्थितीचा पाहणी दौरा करणार : आ. शरद सोनवणे 

नारायणगाव – जुन्नर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात आदिवासी ग्रामीण भागातील दुष्काळ स्थितीची पाहणी आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयाचा आमदार शरद सोनवणे आणि विविध खात्याचे अधिकारी यांचा दौरा गुरुवार (दि. 25) आणि शुक्रवार (दि. 26) आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यात जुन्नर तालुक्‍याचे आमदार शरद सोनवणे हे जुन्नर तहसीलदार हनुमंत कोळेकर, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, तालुका कृषी अधिकारी, एमएसईबी अधिकारी, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, वनविभाग, पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, छोटे पाटबंधारे अधिकारी आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी गुरुवारी (दि. 25) सकाळी तांबे येथून दौरा सुरु होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी बोतार्डे, राळेगण, शिंदे, घंगाळदरे, सोनावळे, इंगळून, भिवाडे, शिवली, कालदरे, उच्छील, आंबोली, धालेवाडी, वानेवाडी, आपटाळा, माणकेश्वर, केळी, चावंड, शिरोली, कुकडेश्वर, उसरान, खडकुंबे, फांगुळ गव्हाण, जळवंडी, घाटघर अंजनावळे, देवळे, खैरे, खटकाळे निमगिरी, केवाडी, उंडेखडक, राजूर न. 1, हडसर, राजूर न. 2, माणिकडोह, खामगाव, गोद्रे आदी गावात पाहणी करणार आहेत. शुक्रवारी (दि. 26) सकाळी नारायणगाव ग्रामीण रुग्णालय आणि जुन्नर ग्रामीण रुग्णालयाची पाहणी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बिलोलीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या समवेत करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)