#AUSvIND : ड्रॉप-ईन पिच म्हणजे काय?

पर्थ – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेतील दुसरी कसोटीला सुरूवात झाली असून या कसोटीसाठी मैदानावरील खेळपट्टी ही “ड्रॉप-ईन पिच’ या धर्तीवर तयार करण्यात आली आहे. या खेळपट्टीवर हिरवे गवत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारताने आपल्या संघात चार जलदगती गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ड्रॉप-ईन पिच म्हणजे काय? हे बऱ्याच जणांना माहित नाही.

“ड्रॉप-ईन पिच’ ही खेळपट्टी तयार करण्याची आधुनिक पध्दत आहे. यात खेळपट्टी ही सामना खेळल्या जाणाऱ्या मैदानापासून दूर तयार केली जाते. ही खेळपट्टी स्टीलच्या फ्रेममध्ये तयार केली जाते. या खेळपट्टीची खोली 20 सेंटीमिटर असते आणि याचे वजन 30 टन इतके असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही खेळपट्टी सामन्याआधी काही दिवस क्रेनच्या मदतीने मैदानात आणून बसवली जाते. त्यामुळे ड्रॉप-ईन पिच पध्दतीने तयार केलेल्या खेळपट्टीचा अंदाज घेणे खूप अवघड असते. ही “ड्रॉप ईन खेळपट्टी’ मैदानाबाहेत तयार करण्यात येत असल्याने आणि या खेळपट्ट्यांना पूर्वेइतिहास नसल्याने याचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यामुळे नाणेफेक जिंकून काय करावे हा कर्णधारापुढे यक्षप्रश्न असतो. जरी या खेळपट्टीवर हिरवे गवत असले तरी त्या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेईल का याबाबतीत शंका निर्माण होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)