…यामुळे ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली – तुम्हाला आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्ससची मूळ प्रत दाखविण्याची गरज राहणार नाही. केवळ मोबाईलमधील ई-कॉपी दाखवली तरी पुरेसे आहे. तसे निर्देशच केंद्र सरकारने राज्यांमधील ट्रॅफिक पोलिस व परिवहन विभागांना दिले आहेत.

आयटी अॅक्टचा हवाला देत परिवहन मंत्रालायने ट्रॅफिक पोलिसांना व्हेरिफिकेशनसाठी ड्रायव्हिंग लायन्सस, नोंदणी प्रमाणपत्र किंवा विम्यासारखी कागदपत्रांची मूळ प्रत घेऊ नये. त्याऐवजी डिजीलॉकर किंवा एमपरिवहन सारख्या अॅपचा उपयोग करावा, असे सांगण्यात आले आहे. यानुसार ट्रॅफिक पोलीस त्याच्या जवळील असलेल्या डिव्हाईसने क्युआर कोड स्कॅन करून डेटाबेसमधून माहिती काढू शकते. त्यासाठी मूळ कागदपत्रांची गरज लागणार नाही.

-Ads-

दरम्यान, अनेक वेळा ट्रॅफिक सिग्नल तोडल्यावर, अनियंत्रित वेगामुळे किंवा ड्रायव्हिंग करताना फोन वापरल्याने पोलीस मूळ कागदपत्रे जप्त करत होती. यावेळी अनेक कागदपत्रे हरवल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. यावर परिवहन मंत्रालयाने मूळ कागदपत्रे न घेण्याचे निर्देश दिले आहेत.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)