रस्त्यांवरील मिरवणुकीचे गाडे 24 तासांत उचला

– सार्वजनिक मंडळांना महापालिकेचा “अल्टिमेटम’

पुणे – गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात सार्वजनिक मंडळांनी मिरवणुकीसाठी वापरलेले गाडे मध्यवर्ती भागांतील रस्त्यांवर तसेच पडून आहेत. यामुळे वाहतूक कोंडी होत अससल्याने या मंडळांनी पुढील 24 तासांत हे गाडे सार्वजनिक रस्त्यावरून काढून घेण्याचे आदेश महापालिकेने मंडळांना दिले आहेत.

रस्त्यांवरील गाडे काढले न गेल्यास संबंधित गाडा मालकाविरोधात थेट फौजदारी गुन्हा दाखल करून हे गाडे भंगारात काढणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवादरम्यान मिरवणुका तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी हे गाडे वापरले जातात. मात्र, त्यानंतर ते रस्त्यांवर तसेच सोडले जातात. हे गाडे जेथे उभे आहेत,तेथे रस्त्यांची स्वच्छता करण्यात अडचण होत असून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्राणांतिक अपघात होण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे संबंधित मंडळांनी आणि मालकांनी गाडे 24 तासांच्या आत सार्वजनिक रस्त्यांवरुन काढून घ्यावेत, अन्यथा पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलीस यांच्यामार्फत गाडा मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच सदरचे गाडे जेसीबी आणि गॅस कटरच्या साह्याने तोडून गाड्यांचे साहित्य जप्त करण्यात येणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)