तऱ्हा पोशाखाच्या

पुणेरी पगडी, धोतर, स्त्रियांमध्ये नऊवारी साडी, खोपा अशी पुण्याच्या राहणीची ओळख अगदी मोजक्‍या शब्दात करून देता येत असे. पण आज हे शक्‍य आहे का हो! याचं उत्तर चक्क “नाही’ द्यावं लागेल. कारण पुण्यात आज रस्त्यावरून जाताना अगदी सहज जरी नजर टाकली ना, तरी नऊवारी साडी, पाचवारी साडी, पंजाबी ड्रेस, जीनची पॅंट-टी शर्ट असे अनेक प्रकारचे कपडे दिसतात. या सगळ्या बदलांविषयी, बदलांच्या प्रवासाविषयी खूप उत्सुकता वाटते.

वाड्यात असताना घरातील वयस्कर स्त्रिया नऊवारी साडीच नेसत. पण स्त्रिया जशा शिक्षिकेची सोडून इतर ठिकाणीही नोकऱ्या करू लागल्या आणि त्यात बदल होऊ लागला, यामुळे वाडा संस्कृतीत बदल झाला हे नक्की. नऊवारी साडीची जागा सहावारीने घेतली. पुण्यात मराठी सामाजिक चित्रपट गावातल्या थिएटरना लागत. मराठी साहित्य कथा, कादंबऱ्या वाचणारेही पेठांमध्येच होते. त्यामुळे सुद्धा वेषभूषेत फरक झाला असावा. स्टार्च, इस्त्रीशिवाय कपडे वापरायचे नाहीत. या विचाराने राहणी झकपक झाली. अंदाजे 70-72 च्या काळात पंजाबी ड्रेस आला तो मात्र नवनवीन रूपे घेऊन आजही आहे. विशेष म्हणजे योगासनांसाठी, प्रवासासाठी महिलांना तो सुटसुटीत वाटतो. आई पंजाबी ड्रेस घालणारी त्यामुळे मुलगी जीन, टी-शर्ट, शॉर्ट टॉप घालणार हे उघड होतं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुलाच्या पलीकडचं पुणं म्हणजे डेक्कन, प्रभात रोड हे मात्र आधीच सुधारलेलं होतं. कारण प्रभात रोड म्हणजे हाय-फाय लोकांची वस्ती आणि अर्थातच त्यानुसार त्यांची राहणी होती.

वाडा संस्कृतीत एकच एक ठरलेलं विश्‍वासू दुकान कायम त्या दुकानातूनच खरेदी करायची पण या मानसिकतेलाही छेद बसला. व्हरायटी आवडू लागली. निवड करण्यासाठी दुकानेही अधिक मिळाली. आवड निवड वाढू लागली. वस्त्र खरेदी करण्याचे ठराविक कारणही नाहिसे होऊन सणवार सोडून इतरवेळीही खरेदी होऊ लागली, वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, नात्यातल्या कुणाचं लग्न अशी अनेक कारणं सापडू लागली. वेगवेगळ्या राज्यातली वस्त्र-प्रावरणं येऊ लागली आणि आणखी व्हरायटी मिळू लागली. नवं-नवं आवडायला लागलं.

पुरुषही लग्न कार्यात झब्बा वापरू लागले. घरात त्यांना “बर्मुडा’ पॅंट वापरणं चांगलं, सुटसुटीत वाटू लागलं. पुरुषांच्या राहणीतही बदल झाला. डिझाइन असलेले शर्ट आले, जीनच्या पॅंट आल्या, रविवारी तर टी-शर्टच पसंत पडू लागला. ब्रॅंडेड कपडे आले. पूर्वी लक्ष्मीरोडवर चक्कर मारली तर स्त्रियांच्या कपड्यांची दुकानं जास्त दिसायची. नंतर नंतर मात्र पुरुषांच्या कपड्याच्या शोरूम आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)