पुणे – पूनम खेमनार(नाबाद 37धावा व 3-24) हिने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर झोन 2 संघाने आझम कॅम्पस संघाचा 9 गडी राखून पराभव करत हेमंत पाटील क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित हेमंत पाटील ड्रीम वन प्रिमियर लीग एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली.
आझम कॅम्पस येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत झोन 2 संघाच्या कविता कुवर(3-7), पूनम खेमनार(3-24) यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे आझम कॅम्पसचा डाव 23.3 षटकात 88धावावर संपुष्टात आला. यात शुभांगी शिवल 8, प्रियांका पाटील नाबाद 7, लुजेन मुजावर 7 यांनी थोडासा प्रतिकार केला. हे आव्हान झोन 2 संघाने 8.1षटकात 1गडयाच्या बदल्यात 89 धावा करून पूर्ण केले.
यात पूनम खेमनारने नाबाद 37धावा, वैष्णवी शिंदेने नाबाद 16धावा, अंबिका वाटाडेने 11धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. पूनम खेमनार(नाबाद 37धावा) व वैष्णवी शिंदे(नाबाद 16धावा)यांनी दुसऱ्या गडयासाठी 36 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. सामन्याची मानकरी पूनम खेमनार ठरली.
सविस्तर निकाल : साखळी फेरी :
आझम कॅम्पस: 23.3 षटकात सर्वबाद 88धावा(शुभांगी शिवल 8, प्रियांका पाटील नाबाद 7, लुजेन मुजावर 7, कविता कुवर 3-7, पूनम खेमनार 3-24, मानसी जाधव 1-7, सायली लोणकर 1-12) पराभूत वि. झोन 2 : 8.1षटकात 1बाद 89धावा(पूनम खेमनार नाबाद 37(27,6चौकार), वैष्णवी शिंदे नाबाद 16(17), अंबिका वाटाडे 11, प्रिया भोकरे 1-0);सामनावीर-पूनम खेमनार;