सपना चौधरीची बॉलीवूडमध्ये एन्ट्री

बिग बॉस मधून जास्त प्रसिद्धी मिळवणारी डान्सर सपना चौधरी सध्या खूप चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून सपनाने फक्त आपला लूकचं बदलला नाही तर कामही बदलले आहे. आता सपना केवळ डान्सर राहिली नाही तर अभिनेत्रीही बनली आहे. सपना बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता सपनाच्या डेब्यू सिनेमाचे पहिले मोशन पोस्टरही रिलीज झाले आहे.

सपनाचा डेब्यू सिनेमा ‘दोस्ती के साईड इफेक्‍ट’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या चित्रपटात सपनाच्या अपोझिट अभिनेता विक्रांत आनंद लीड रोलमध्ये आहे. याशिवाय जुबेर के खान, अंजू जाधव हेही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट 14 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. जोयल डॅनिअलची निर्मिती असलेला हा चित्रपट हादी अली अबरार दिग्दर्शित करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सपनाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. जीममध्ये व्यायामाला गेलेल्या सपनाचे स्वागत जोरदार म्युजिकने केले गेले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी तिथेही ठुमके लावून नाचायला सुरुवात केली. हृतिकचा “कहो ना प्यार है’मधील “इक पल का जीना’ या गाण्यावर अन्य दोन मुली नाचायला सुरुवात करतात आणि सपनालाही नाचायला लावतात. त्यांच्या बरोबर सपनाही नाचते हे सांगायला नकोच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)