महाराष्ट्रीयन डर्बीमध्ये नाटकीयरित्या पुणेरी पलटण विजयी

पुणे लेगच्या तिसर्या दिवशी पुणेरी पलटण आणि यु मुंबा या दोन महाराष्ट्रीयन संघात सामना झाला . हा सामना पुणेरी पलटणने शेवटच्या मिनिटाला  ३३-३२ असा जिंकला. पुणेरी संघासाठी नितीन तोमर याने रेडींगमध्ये १३ गुण मिळवले तर कर्णधार गिरीष एर्नेकने ५ गुण मिळवले. यु मुंबाचा स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाई याने १५ रेडींग गुण मिळवत आपला करिष्मा पुन्हा सिद्ध केला.

पहिल्या सत्राची सुरुवात पुणेरी पलटण साठी खराब झाली त्यांचा मुख्य रेडर नितीन तोमर पहिल्याच रेडमध्ये बाद झाला. परंतु, त्याला पुन्हा लवकर कोर्टवर आणण्यात त्यांना यश मिळाले. पहिल्या सत्रात  १० मिनिटांचा खेळ झाला होता तेव्हा दोन्ही संघाची गुणसंख्या ६-६ अशी बरोबर होती. त्यानंतर पहिले सत्र संपले तेव्हा पुणेरी संघाने १७- १२ अशी आघाडी घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सत्राची सुरवात यु मुंबाच्या सिद्धार्थने जबरदस्त केली. त्याने दुसऱ्याच मिनिटात सुपर रेड करत विरोधी संघाचे तीन मुख्य डिफेंडर बाद केले.  दुसऱ्या सत्रातील १० मिनिटे पूर्ण झाली तेव्हा  पुणेरी पळतां २८-२२ असे आघाडीवर होते. सामना संपण्यास दोन मिनिटे बाकी होते तेव्हा गुणसंख्या ३१-३१ अशी बरोबर होती.

यु मुंबाचा रेडर सिद्धार्थ रेड करण्यास आला. पुणेरी संघाच्या कोर्टात फक्त तीन खेळाडू होते. त्यामुळॆ त्यांना सर्वबाद करून आघाडी मिळवण्याची एक संधी त्याला होती. परंतु, त्याचा पाय लॉबीमध्ये गेलाआणि लॉबीच्या नियमामुळे त्याला बाद करण्यात आले. त्याचबरोबर पुणेरी पलटण संघाला २ गुण मिळाले.  त्यांची आघाडी ३३- ३२ अशी झाली. शेवटच्या रेडमध्ये पुणेरी संघाचा रडार बाद झाला परंतु त्यामुळॆ फक्त एक गुण मुंबाला मिळाला. शेवटी हा सामना पुणेरी पलटण संघाने ३३-३२ असा जिंकला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)