माढा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील रिंगणात उतरणार

सातारा – देशात हाय व्होल्टेज ठरलेल्या माढा मतदारसंघात दिवसभर नाट्यमय घडामोडी घडत होत्या. माढयातून पुन्हा विजय सिंह मोहिते पाटील यांच्या नावाच्या चर्चेन जोर धरला आहे. मात्र या जागेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं नाव मागे पडलं असून, विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विजयसिंह मोहिते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली तर माढ्यात त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संजय शिंदे यांचं आव्हान असेल.

माढा मतदारसंघासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यामुळे माढामधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी थेट लढत होणार असं म्हटलं जात होतं.
पोराच्या वाटचालीला बापाचा आशीर्वाद

परंतु भाजपकडून माढा मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव मागे पडलं. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे माढाचा भाजपचा उमेदवार म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. मात्र मोहिते पाटलांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यामुळे विजय सिंह किंवा रणजितसिंह ही बापलेकाची जोडी सध्या तरी भाजपने चर्चेत केंद्रस्थानी ठेवली आहे. मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती.

भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्‍यता वर्तवली जात होती, मात्र चंद्रकांत पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं. आता सर्वेक्षणात पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आल्याने, उमेदवारीसाठी त्यांचीच चर्चा आहे.

  • कोण आहेत विजयसिंह मोहिते-पाटील?
  • राज्याच्या राजकारणात जी काही मातब्बर घराणी आहेत,
  • त्यात मोहिते-पाटील घराण्याचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं.
  • सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ राजकारणी आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री
  • 1980 ते 2009 दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार
  • विजयसिंह मोहिते पाटील हे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. याच मतदारसंघात 2009 मध्ये शरद पवार खासदार होते. विजयसिंह मोहिते पाटील यांनी उपमुख्यमंत्री, पर्यटनमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम अशी खाती सांभाळलेली आहेत. त्यांचे पुत्र रणजितसिंह राष्ट्रवादीचे राज्यसभेवर खासदार होते. त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)