डॉ. संतोष पोळ याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी

कळंबा कारागृहात आरोपीकडे पिस्तुल आणि मोबाईल असल्याचे व्हिडिओ प्रकरण

कोल्हापूर, (प्रतिनिधी) दि. 29 – येथील कळंबा कारागृहात सहा खुनाचे आरोप असणारा न्यायालयीन बंदी डॉ. संतोष पोळ याची पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रशासकीय कारणास्तव त्याला हलविल्याचे कारागृह अधिक्षक शरद शेळके यांनी सांगितले आहे.

-Ads-

पोळ सध्या कारागृहामध्ये मोबाईल व्हिडिओ चित्रिकरण व बनावट पिस्तुलामुळे चर्चेत आला आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. दरम्यान आज पोळला मोबाईल पुरविल्या प्रकरणी कारागृहातील संशयित अधिकारी व कर्मचारी अशा बारा जणांची कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी चौकशी केली. याबाबत जबाब नोंदवून घेण्यात आले. यासंबधीचा अहवाल त्या उद्या (दि-30) गृहखात्याकडे सादर करणार आहेत. त्यानुसार दोषींवर पुढील कारवाई होईल, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)