पुणे – डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांना अटक करावी आणि अट्रॉसिटी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागण्यासाठी पुणे शहरातील विविध संघटनांनी डेक्कन जिमखाना गुडलक चौकात मंगळवारी निदर्शने केली .
दरम्यान, वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर पायल तडवी यांनी 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आज नायर हॉस्पिलमधील स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. यी चिंग लिंग, वरिष्ठ निवासी डॉक्टर हेमा आहुजा, डॉ. भक्ती महिरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा जणांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. समितीने चौकशी करून दिलेल्या अहवालानंतर चारही डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली आहे