छोट्या गावांमध्येही पोलीसांसाठी घरे 

निवासस्थानांच्या वाटपासाठी नवीन सॉफ्टवेअर आणणार

मुंबई – मुंबईसारख्या शहरात पोलिसांना घरे मिळत असताना आता ग्रामीण भागातील पोलीसांनाही घरे मिळणार आहेत. राज्यातील छोट्या गावांमध्येही पोलीसांसाठी निवासस्थाने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून बांधण्यात येतील. त्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी दिले आहेत.

मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत डॉ. पाटील बोलत होते. यावेळी गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पाटील यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई ते पोलीस अधिकारी यांच्या निवासस्थान वाटपाची कार्यपध्दती, निवासस्थान वाटपाचे धोरण, वाटपादरम्यान होणारी दिरंगाई, रिक्त निवासस्थानांबाबतची माहिती, तसेच सेवानिवृत्ती नंतरही शुल्क आकारुन वापरात असलेली निवासस्थाने इत्यादीबाबतच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. निवासस्थान वाटप करण्याच्या पध्दतीत पारदर्शकता असण्याची सूचनाही केली. त्यावर निवासस्थांच्या वाटपात पारदर्शकता आणण्यासाठी नवीन सॉंफ्टवेअर आणण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

अकोला येथील सार्वजनिक-खासगी भागीदारीतून पोलीस सेवा निवासस्थानाच्या बांधकाम करण्यासंबंधी प्राप्त झालेल्या प्रस्तावांबाबत पोलीस अधीक्षकांनी योग्य ती कार्यवाही करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचे निर्देशही यावेळी डॉ. पाटील यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)