डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलन 20 जानेवारीला

सासवड- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार साहित्य संमेलनाचे 20 जानेवारी रोजी येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनमध्ये आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्‌घाटन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते होणार आहे. तर साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची संमेलनाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. समारोप साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या व्याख्यानाने होणार असल्याची माहिती सिद्धार्थ सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संमेलनाचे स्वागताध्यक्ष पंकज धिवार यांनी दिली.

धिवार म्हणाले की, संमेलनात माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे व फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रकाश पवार उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकार राही भिडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यामध्ये डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. संभाजी मलघे, डॉ. रमेश जाधव, डॉ. शरद गायकवाड व अन्वर राजन हे सहभागी होणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या “मी वादळवारा’ या प्रबोधनपर गाण्यांच्या कार्यक्रमाने समारोप होणार आहे. तसेच यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे, असल्याची माहिती संयोजन समितीचे सचिव संदीप बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, कार्याध्यक्ष रविंद्र वाघमारे, स्वप्निल घोडके, रविंद्र काकडे, राजेश काकडे, भीमराव कांबळे, वामन गायकवाड, स्वप्निल कांबळे, अजय धिवार, दिपक वाघमारे, एकनाथ कांबळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)