डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धा
पुणे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल ऍकॅडमी तर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) व विक्रम पिल्ले ऍकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया संघाने एक्सलन्सी ऍकॅडमीचा 5-3 असा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. एफसीआयच्या वैंकटेश देवकर याने दोन गोल तर, गुरफान शेख, आकाश पवार व अनुज सिंग यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. एक्सलन्सी ऍकॅडमीकडून (विनीत कांबळे याने दोन व विनोद नायर याने एक गोल केला. विक्रम पिल्ले ऍकॅडमी अ संघाने ग्रीन मेडोज् संघाचे आव्हान 6-0 असे परतावून लावत अंतिम चार संघामध्ये आपले नाव निश्चित केले. विजयी संघाकडून युवराज वाल्मिकी याने तीन गोल करून विजयात महत्वाचा वाटा उचलला.
सविस्तर निकाल : उपांत्यपुर्व फेरी :
फुड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाः 5 (गुरफान शेख 3 मि., वैंकटेश देवकर 10, 53 मि.; आकाश पवार 17 मि., अनुज सिंग 50 मि.) वि.वि. एक्सलन्सी ऍकॅडमीः 3 (विनीत कांबळे 23, 32 मि., विनोद नायर 58 मि.); हाफ टाईमः 3-1;
विक्रम पिल्ले ऍकॅडमी अः 6 (युवराज वाल्मिकी 13, 20, 47 मि., फिलीप बा 34 मि.; देवेंद्र वाल्मिकी 35 मि., रूबेन केदारी 37 मि.) वि.वि. ग्रीन मेडोजः 0; हाफ टाईमः 2-0.