आंबेडकरी चळवळीचे विचारवंत डॉ. अविनाश डोळस यांचे निधन 

औरंगाबाद – आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉ. अविनाश डोळस यांचे निधन झाले. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी औरंगाबादेत अखेरचा श्वास घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्‍याने डोळस यांचे निधन झाले.

डॉ. अविनाश डोळस राज्य सरकारच्या डॉ. आंबेडकर चरित्र, साहित्य, साधने व प्रकाशन समितीचे सदस्य सचिव होते. मिलिंद कला महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यांनी 35 वर्षे मिलिंद कलामहाविद्यालयात ज्ञानदानाचे काम केले. डोळस यांनी 35 पुस्तके लिहिली असून त्यात कथा-कादंबऱ्यांचा समावेश आहे.

सम्यक्‌ दृष्टी, आंबेडकरी साहित्य, फुले-आंबेडकरी चळवळ आणि साहित्य, सामाजिक परिवर्तनाचे संदर्भ, मराठी दलित कथा आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. अखिल भारतीय दलित नाट्य संमेलनाचे जानेवारी 1990 मध्ये अध्यक्षपद, तर आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जानेवारी 2011 मध्ये भूषवले होते. तसेच ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या बहुजन महासंघाचे नेते होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)