डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार खा. आढळराव पाटील यांचे आश्‍वासन 

राजगुरुनगर – येथील बस स्थानकातील हुतात्मा राजगुरू यांचा अर्धपुतळा मागे घेवून तेथे हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचे अर्धपुतळे बसविण्यात आले आणि परिसर सुशोभित केला. मात्र, समोर असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा सर्वांगीण विकास करून येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी (दि. 22) राजगुरूनगर येथील शेतकरी मेळाव्यात केली.

खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या फंडातून 50 लाख रुपयांचा निधीतून राजगुरुनगर शहरात एसटी बस स्थानकासमोर पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या हुतात्मा राजगुरू यांचा पुतळा मागे घेवून तेथे भव्य स्मारक उभे करण्यात आले आहे. या स्मारकात हुतात्मा राजगुरू, भगतसिंग सुखदेव यांचे पुतळे उभे करून संपूर्ण परिसर सुशोभीकरण केले आहे. मात्र, त्या समोरील घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा दुर्लक्षित राहिला आहे. पुतळा परिसरात मोठी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र डॉ. आंबेडकर यांचा पुतळा व परिसर विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खेड तालुका भीमशक्‍ती संघटनेच्यावतीने व स्थानिक नागरिकांनी केला होता. याबाबत भीमशक्‍ती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा विजय डोळस यांनी दिला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, सोमवारी हुतात्मा राजगुरू, भगतसिंग सुखदेव यांच्या पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर बाजार समितीच्या आवारात शेतकरी मेळावा झाला होता त्याममध्ये खासदार आढळराव पाटील यांनी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसर सुशोभीकरण करून डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याची घोषणा केली. याबरोबरच यासाठी खासदार फंडातून 50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला जाईल. राजगुरुनगर शहराचे वैभव वाढेल, असे बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करू, असे आश्‍वासन खासदार आढळराव पाटील यांनी दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)