सवर्ण आरक्षण “चुनावी जुमला’ असल्याची शंका : शरद पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने सवर्ण जातींना 10 टक्के आरक्षण दिले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकेल असे मला वाटतं नाही, अशी शंका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते.

आघाडी करण्यासंबंधी चर्चा
यावेळी जागावाटपाबाबत पवार म्हणाले, की राज्यात ज्याची जास्त ताकद त्या पक्षाला जास्त जागा, असे सूत्र असायला हवे. त्यानुसार जागावाटप व्हायला हवे. कॉंग्रेससोबत आघाडी करण्यासंबंधी चर्चा सुरू आहे. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा झाली आहे. देश पातळीवर आम्ही एकत्र येण्याचा विचार नाही. पण, राज्य पातळीवर एकत्र निवडणूक लढवू, असे ते म्हणाले. भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला असून लोक आता संतापली आहेत अस देखील पवार म्हणाले आहेत.

कोल्हापुरात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सवर्ण आरक्षणाबाबत पवार म्हणाले, की सवर्ण आरक्षण हे संविधानाच्या मूळ ढाच्याला धक्का लावणारे आहे, असे घटनातज्ज्ञांचे मत आहे. घटनेत आरक्षणाची मर्यादा 50 टक्के आहे. याआधी महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानमध्ये आरक्षणाचे प्रयोग करण्यात आले होते. पण, हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे हे आरक्षण तरी न्यायालयात टिकेल का याबद्दल शंका आहे. हे आरक्षण कुणासाठी हा प्रश्न आहे. याचा लाभ शहरातील काही सुशिक्षीत कुटुंबातील मुलांनाचा होईल. खेड्यातील मुले मात्र या स्पर्धेत मागे पडतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरक्षणाचा निर्णय आत्ताच का घेतला गेला असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की निवडणुकीला काही महिने बाकी आहेत. जे निर्णय पावणे पाच वर्षात घेतले नाहीत ते आताच का घेतले. त्यामुळे हा चुनावी जुमला असल्याची शंका येते. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)