1994मध्ये डिजनीतर्फे पहिल्यांदा रिलीज करण्यात आलेला ऍनिमेटेडपट ‘द लायन किंग’ आजही नाईंटीजच्या किड्ससाठी तेवढाच स्पेशल आहे यात शंका नाही. मात्र त्यातच भर म्हणून बॉलिवूडचा किंग खान शाहरुख या चित्रपटासाठी आपला मुलगा आर्यन खानसह आवाज देणार असल्याने फॅन्ससाठी हा दुग्ध शर्करा योग ठरणार आहे. ‘सिम्बा’ या मुख्य भूमिकेला आर्यन आवाज देणार आहे. तर मुफसा या भूमिकेसाठी शाहरुख आवाज देणार आहे.
It is time…To welcome the true king. #TheLionKing in cinemas July 19@iamsrk #Mufasa pic.twitter.com/RDTezAkwqt
— Walt Disney Studios (@disneyfilmindia) June 28, 2019
आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूड घेऊन जंगलावर आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लढणाऱ्या छाव्याची कहाणी ‘द लायन किंग’ चित्रपटातून दाखवली जाणार आहे. हा चित्रपट भारतामध्ये हिंदीसह तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये देखील (19 जुलै रोजी) रिलीज केला जाणार आहे.
SRK, Aryan Khan, Arvind Swami, Nani, Siddharth, Jagapathi Babu, Aishwarya Rajessh, Sunidhi Chauhan, Armaan Malik, Shernaz Patel… The biggest of names associate with #TheLionKing… 19 July 2019 release in #English, #Hindi, #Tamil and #Telugu pic.twitter.com/8huskn9R6l
— taran adarsh (@taran_adarsh) July 5, 2019
‘द लायन किंग’च्या हिंदी व्हर्जन्ससाठी मराठी अभिनेता श्रेयस तळपदे ‘टीमॉन या भूमिकेला आवाज देणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते आसरानी यांचा आवाज ‘झाझू’च्या भूमिकेला असेल. संजय मिश्रा ‘पुम्बा’साठी तर आशिष विद्यार्थी ‘स्कार’साठी आवाज देणार आहेत.
तसेच, ‘द लायन किंग’ चित्रपटाच्या तामिळ आणि तेलगू व्हर्जन्सना तामिळ व तेलगू सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आवाज दिला आहे.