गंभीर खासदारकीचा संपुर्ण पगार करणार दान

नवी दिल्ली – भारतीय संघाचा माजी फलंदाज आणि नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर हे आपला संपूर्ण पगार समाज कार्यासाठी दान करणार आहेत. खासदार म्हणून मिळणार पगार दिल्लीतील स्मशान भूमीच्या नवनिर्माणासाठी ते देणार आहेत. गंभीर खासदार झाल्यानंतरही जबाबदारीने आपली काम करताना दिसत आहेत. गौतम गंभीरयांनी नुकतेच गीता कॉलोनी स्मशान भूमी येथील परिसराचा दौरा केला. त्यामुळे या स्मशान भूमिपासूनच कामाची सुरुवात करण्याचा निर्णय गौतम गंभीर यांनी घेतला आहे.

ईस्ट दिल्लीतील सर्वच स्मशान भूमी आणि तेथील परिसराचे पुनर्निर्माणासाठी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यासाठी, आपला खासदारकीचा संपूर्ण पगार गौतम गंभीर देणार आहे. परिसरातील काही पर्यावरणप्रेमी मित्र आणि संघटनांशीही गौतम संपर्कात असून पर्यावरणपूरक कामे करण्यास ते उत्सुक आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्मशान भूमी येथील परिसरात शेड बसवणे, पाणी, नवीन प्लॅटफॉर्म, लोकांना बसण्यासाठी बेंच यांसह इतरही कामे प्राधान्यक्रमाने आहेत. गौतमयांनी 9 जुलै रोजी ट्‌विट करुन मी खासदार म्हणून मला मिळणारा पगार समाजकार्यासाठी देणार असल्याचे म्हटले होते.

राजकारण हे शहरातील लोकांची मदत करण्यासाठी मी निवडलेला एक मार्ग आहे. त्यामुळेच, एक खासदार म्हणून मला मिळणारा पगार मी, माझ्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी आणि सुख-सुविधांसाठी वापरणार असल्याचे त्यांनी ट्‌विट करुन म्हटले आहे. त्यामुळेच ईस्ट दिल्लीच्या विकासासाठी, येथील स्मशान भूमीच्या पुनर्निर्माणासाठी या पैशाचा वापर केला जाईल, असेही गौतमयांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)