पत्नी मेलोनियासह डानॉल्ड ट्रम्प यांचा अचानक इराक दौरा

बगदाद (इराक): अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प पत्नी मेलोनियासह अचानक इराक दौऱ्यावर आले आहेत. इराकमधील अमेरिकन सैनिकांना क्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी ते इराकला आल्याचे सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांचा हा पहिलाच इराक दौरा आहे. अमेरिकेच्या महान सैनिकांना शुभेच्छा देण्यासाठी आपण येथे आलो असल्याचे त्यांनी बरोबरच्या पत्रकारांना सांगितले. अनवर येथील अयान अल-असद लष्करी तळावरील ट्रम्प यांचा हा दौरा केवळ दोन तासांचा होता. तेथील 100 सैनिकांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत माहिती जाहीर करण्यात आली.

अमेरिकेतील सरकारी कामकाज आंशिक प्रमाणात ठप्प झाले आहे, अशा वेळेस ट्रम्प यांनी इराकला भेट दिली. आपल्या लढवय्या सैनिकांच्या पराक्रमाला, त्यांच्या यशाला, त्यांच्या बलिदानाला वंदन करण्यासाठी आपण येथे आल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. इराक दौऱ्यात ट्रम्प यांनी कोणाही इराकी नेत्याची भेट घेतली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)