‘किकी’ चॅलेंज स्वीकारून आपला जीव धोक्यात घालू नका : नोयडा पोलीस 

सोशल मीडियावर कधी कोणते ‘चॅलेंज’ व्हायरल होईल याचा काही भरवसा नाही. कधी कट द बियर्ड चॅलेंज तर कधी फिटनेस चॅलेंज अशी वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने सोशल मीडियावर लोक एकमेकांना देत असतात. सोशल मीडियावर ‘अॅक्टिव्ह’ असणारी मंडळी देखील अशा प्रकारच्या आव्हानांना स्वीकारून आपण देखील नव्या जमान्या प्रमाणे ट्रेंडी असल्याचा आव आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशीच काही ‘चॅलेंजेस’ नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांसाठी मात्र डोकेदुखीची ठरतात.

याचाच प्रत्यय सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या ‘किकी’ चॅलेंजच्या माध्यमातून येत आहे. देशभरात सोशल मीडियावर अतिउत्साही असलेले काही लोक या चॅलेंजला स्वीकारून आपला व इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. या आव्हानांमध्ये लोकांना चालत्या चारचाकीमधून खाली उतरून नृत्य करायचे आहे. गाडी चालू ठेऊन कराव्या लागणाऱ्या या ‘डान्सिंग’ चॅलेंजला पूर्ण करण्यासाठी नागरिक आपला जीव धोक्यात घालत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या आव्हानामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका लक्षात घेता नोयडा पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. “अशा प्रकारे गाडी चालवणे आपल्या व इतरांच्या जीवास धोका निर्माण करणारे आहे. नागरिकांनी कृपया हे चॅलेंज स्वीकारून आपला जीव धोक्यात घालू नये” असे आव्हान केले आहे.

दरम्यान ड्रेक या कॅनडियन रॅप गायकाच्या ‘किकी डू यु लव्ह मी’ या गाण्यापासून हे चित्र-विचित्र चॅलेंज प्रेरित झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)