इतर देशांच्या तुलनेत रूपयाचे मूल्य अजूनही योग्य पातळीवर

मुंबई – डॉलर वगळता इतर देशाच्या चलनाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन होत आहे. भारताच्या रुपयाची गेल्या काही महिन्यात बरीच घसरण झाली आहे. तरीही रुपयाचे मूल्य इतर वेगाने विकसित होणाऱ्या देशापेक्षा कमी प्रमाणात कोसळले असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले की, वेगाने विकसित होणाऱ्या इतर देशांचे चलन रुपयापेक्षा जास्त कोसळले आहे. व्यापारयुद्ध आणि तत्सम कारणामुळे रुपयासह सर्वच देशांच्या चलनावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी आशा त्यानी व्यक्त केली.

ते म्हणाले की, इतर चलनाच्या किमतीच्या अनुषंगाने रुपयाचे मूल्य वेळोवेळी ठरत असते. त्यामुळे रुपयाचे मूल्य कोणत्या पातळीवर असावे याबाबत रिझर्व्ह बॅंकेने काही ठरविले नसल्याचे त्यांनी सांगितले. रुपयाचे मूल्य काही प्रमाणात कमी झाले असले तरी त्यामुळे भारताला फार चिंता करण्याची गरज नाही. कारण भारताकडे यावेळी तब्बल 400 अब्ज डॉलरचे परकीय चलन आहे. त्यातून भारत 10 महिने पुरेल एवढी आयात करू शकतो असे त्यानी सांगितले. 2013 वेळी मात्र भारताकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात परकीय चलन नव्हते असे त्यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)