‘सुषमा स्वराज यांनी चीनसमोर गुडघे टेकले’

राहुल गांधींचा डोकलामवरून हल्लाबोल

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात डोकलाम मुद्दा गाजत असतानाच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर ट्विटरवरून निशाणा साधला आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चीनी ताकदीसमोर गुडघे टेकले आहेत, असा थेट आरोप राहुल गांधींनी सुषमा स्वराज यांच्यावर केला.

-Ads-

सुषमा स्वराज यांनी लोकसभेत सांगितले कि, डोकलाम येथील निर्माण झालेला पेचप्रसंग राजकीय प्रगल्भपणातून सोडवण्यात आला आहे. यावरून राहुल गांधी यांनी सुषमा स्वराज यांना ट्विटरवरून लक्ष्य केले. राहुल गांधींनी ट्वीट केले कि, सुषमा स्वराज यांच्यासारख्या महिलेने चीनी ताकदीसमोर गुडघे टेकले आहेत. ही आश्चर्याची बाब आहे. सरकारने याप्रकारे चीनसमोर गुडघे टेकणे हा सीमेवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांसोबत विश्वासघात आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सिक्कीम सीमेजवळ डोकलाममध्ये चीनच्या महत्त्वाकांक्षी रस्ते निर्मितीवरून भारत आणि चीनी सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. परंतु मागील वर्षी डोकलाम विवाद संपुष्टात आल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, मंगळवारी चीनी सैनिक दोन किलोमीटरपर्यंत भारतीय हद्दीत शिरले होते. चीनच्या या सुमारे ५० सैनिकांना भारतीय जवानांनी मानवी साखळी करून अटकाव करत परत पाठवून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)