जालियनवाला बाग हत्याकांडाची कागदपत्रे पाकिस्तानकडून उघड

लाहोर – ब्रिटीश शासनकाळात अमृतसरमध्ये झालेल्या कुप्रसिद्ध जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रे पाकिस्तानने आज उघड केली. या हत्याकांडाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पाकिस्तानने ही कागदपत्रे उघड केली आहेत.

ब्रिटीश शासनकाळात एप्रिल 1919 मध्ये पंजाब प्रांतात लागू करण्यात आलेला मार्शल लॉ आणि जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित सुमारे 70 ऐतिहासिक कागदपत्रांचे 6 दिवसांचे प्रदर्शन लाहोर हेरिटेज म्युझियममध्ये आयोजित करण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी पाकिस्तानने शहिद भगत सिंग यांच्याविरोधातील खटल्याची कागदपत्रेही अशाच प्रकारे उघड केली होती.

स्वातंत्र्यापूर्वीच्या अविभाजित पंजाब प्रांतातल्या अमृतसरमधील जालियनवाला बागेमध्ये निदर्शने करणाऱ्या नागरिकांवर 13 एप्रिल 1919 च्या बैसाखीच्या दिवशी ब्रिटीश लष्करी अधिकारी कर्नल रेगनाल्ड डायर याने गोळीबार केला होता. यामध्ये शेकडो जण मृत्यूमुखी पडले होते. या कालावधीमध्ये प्रसिद्ध व्यक्तींनी काय केले आणि काय घडामोडी झाल्या, याचा तपशील असलेली कागदपत्रे पाकिस्तानच्य ताब्यात आहेत.
या कागदपत्रांमध्ये मार्शल लॉ आदेशाची प्रत, विविध खटल्यांसाठी नियुक्‍त केले गेलेली कमिशन, कोर्टाच्या सुनावणीच्या संक्षिप्त प्रती, त्यातील निष्कर्श, लाहोरच्या विविध महाविद्यालयांमधील 47 विद्यार्थ्यांवरील खटल्यांची कागदपत्रे, लॉर्ड सिंडेनहडीन यांनी हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये उपस्थित केलेले प्रश्‍न, आदी कागदपत्रांचा समावेश आहे.
या कागदपत्रांमधील नोंदीनुसार या हत्याकांडाबाबत 3 सप्टेंबर रोजी अमृतसरच्य कमिशनरनी पाठवलेल्या पत्रात या हत्याकांडामध्ये एकूण 291 जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. यामध्ये दोन महिला आणि पाच मुलांचाही समावेश असल्याचा उल्लेख आहे. ही प्रत हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)