आपणास हे माहिती आहे काय ?

व्हॉटस्‌अपचा वापर वेगाने वाढला असून ते या सेवेचा खर्च कसा भागवत असतील, असा प्रश्न आपल्याला पडतो. कदाचित म्हणूनच आता ही सेवा विकत घ्यावी लागणार आहे. अर्थात, सर्वसामान्य नागरिकांना नव्हे तर कंपन्या आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा व्हॉटस्‌अप उपलब्ध करून देणार आहे. ही सेवा सप्टेंबरपासून चाचणी स्वरूपात सुरू झाली असून बुक माय शो, मेक माय ट्रीपसारख्या कंपन्या ती वापरत आहेत. व्हॉटस्‌अपची चांगली सेवा ज्याला हवी आहे त्याला ती विकत घ्यावी लागेल, अशी व्यवस्थाही पुढील काळात पाहायला मिळू शकते.

आपण बॅंकेचे प्रतिनिधी आहोत, असे सांगून अनेकांचे बॅंक खाते रिकामे करणारी जमताडा (झारखंड)च्या टोळीचा पोलिसांना छडा लागला आहे. या टोळीची फसवणूक करण्याची पद्धत समजून घेऊन आपण त्यात फसणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. टोळीचे हे भामटे आपण बॅंकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगून बॅंक खाते नंबर, पासवर्ड, कार्ड नंबर, सीवीवी नंबर अशी सर्व संवेदनशील माहिती मिळवत असत आणि बॅंक किंवा कार्डमधून पैसा काही वॅलेटमध्ये ट्रान्सफर करत असत. त्यांच्याकडे बनावट ओळख दाखवून घेतलेले सीम कार्ड सापडले आहेत. तात्पर्य, कोणतीही बॅंक फोनवर कोणतीही माहिती विचारत नाही, त्यामुळे फोनवर बोलून कोणताही आर्थिक व्यवहार न करणे.

-Ads-

भारतात 5 लाख 97 हजार 618 गावे असून त्यातील 43 हजार गावांत अजूनही मोबाइल फोनची सेवा उपलब्ध नाही. अर्थात, ही गावे इतकी दुर्मीळ आहेत आणि त्यांची लोकसंख्या इतकी कमी आहे की त्या गावांत मोबाइल सेवा नसूनही देशातील 97 टक्के नागरिक सध्या मोबाइल सेवा वापरू शकतात.

अमेरिकी ऍपल कंपनीचे बाजारमूल्य एक ट्रीलीयन डॉलर झाले याचा अर्थ त्या कंपनीचा आर्थिक कारभार पोर्तुगल, न्युझीलंड अशा अनेक देशांच्या आर्थिक कारभारापेक्षा मोठा आहे. 1976 साली स्थापन झालेल्या या कंपनीच्या शेअरमध्येती शेअर बाजारात नोंद झाल्यापासून म्हणजे 1980 पासून 50 हजार पट वाढ झाली आहे.

अर्थसार पुरवणीत देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले, लेखक अभ्यास करूनच देत असतात, पण गुंतवणुकीत नेहमीच जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)