माहीत आहे का?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला एकूण 17,16,60,230 मते मिळाली होती. टक्‍केवारीत पाहायचे झाल्यास एकूण मतांपैकी 31.14 टक्‍के इतका भाजपाचा व्होटशेअर होता.

भाजपाने एकूण 428 जागांवर उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 282 विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकांत मोदी लाट असूनही भाजपाच्या 62 उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली होती. दुसरीकडे कॉंग्रेसला 10.69,35,942 इतकी मते मिळाली होती. एकूण मतांमध्ये कॉंग्रेसचा व्होटशेअर होता 19.52 टक्‍के. कॉंग्रेसने 446 जागा लढवल्या, त्यापैकी 44 जागांवरच त्यांचे उमेदवार विजयी झाले. कॉंग्रेसच्या 178 उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)