माहीत आहे का?

2009 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहारमधील बक्‍सर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार जगदानंद सिंह यांची नोंद देशभरात सर्वांत कमी मते मिळवून विजयी झालेले उमेदवार म्हणून झाली आहे. त्यांना एकूण मतांच्या केवळ 21.21 टक्‍के मते मिळाली होती. देशात 29 खासदार असे होते, ज्यांना एकूण मतांच्या 30 टक्‍क्‍यांहून कमी मते मिळाली. यापैकी 14 खासदार उत्तर प्रदेशातील, झारखंमधील सहा, तर बिहारमधील पाच खासदारांचा समावेश आहे.


मागील काळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बासुदेव आचार्य आणि कॉंग्रेसचे माणिक राव होदिया गावित ही दोन नावे नऊ वेळा खासदार म्हणून निवडून गेल्यामुळे विक्रमी म्हणून नोंदवली गेली. या दोघांनी सातव्या लोकसभेपासून पंधराव्या लोकसभेपर्यंत नऊ वेळा संसद सदस्यत्त्व मिळवले. वासुदेव आचार्य यांनी पहिल्यांदा बांकुडा मतदारसंघातून 1980 मध्ये निवडून येत आपल्या खासदारकीच्या या विक्रमी कारकिर्दीची सुरुवात केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)