माहीत आहे का?

2014 मध्ये 66.38 टक्‍के इतके विक्रमी मतदान झाले. 1984 च्या लोकसभा निवडणुका या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झाल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण देशभरात सहानुभूतीची लाट होती. पण तरीही तेव्हा 64 टक्‍केच मतदान झाले होते. 2014 च्या निवडणुकांचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या निवडणुकांसाठी 3400 कोटी रुपये खर्च झाला. 2009 मध्ये हा खर्च केवळ 1500 कोटी रुपये होता. याचा अर्थ निवडणुकीवर होणारा खर्च पाच वर्षांत दुप्पट झाला.

2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काळात सर्वसामान्य मतदारांच्या आयुष्यात कितपत बदल झाला हे देशाने पाहिले आहे. यादरम्यान 2008 ची जागतिक मंदी येऊन गेल्यामुळे अनेक उद्योगधंदे गतप्राण बनले. बॅंकिंग व्यवस्थेलाही त्याचा फटका बसला. आयटी क्षेत्रासह अनेक उद्योग-व्यवसायांमधून नोकरकपात झाल्यामुळे मध्यमवर्गालाही झळा बसल्या. पण वाचकहो, या दहा वर्षांच्या काळात संसदेतील लोकप्रतिनिधींचे उत्पन्न मात्र वाढता वाढता वाढे याप्रमाणे उंचावतच गेले. संसदेतील खासदारांची सरासरी मालमत्ता 2004 मध्ये 55 लाख 25 हजार 834 इतकी होती. ती 2009 मध्ये वाढून 1 कोटी 42 लाख 30 हजार 139 वर गेली. 2014 मध्ये म्हणजेच सोळाव्या लोकसभेमध्ये असणाऱ्या खासदारांची सरासरी मालमत्ता 3 कोटी 25 लाख 96 हजार 257 वर पोहोचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)