मॅंचेस्टर – भारताने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला असून या पराभवामुळे पाकिस्तानचे चाहते संघावर टिका करत आहेत. आता पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी अजब मागणी सोशल मीडियावर केली आहे. काही पाकिस्तानी युवा चाहते काश्मीर नाही तर चक्क भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची मागणी करत आहेत. असा फोटोच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारत-पाक सामन्यानंतर विराट कोहलीचे सर्वच स्तरावरून कौतुक होत असून पाकिस्तानी फॅन्सही स्तुती करताना दिसून येत आहेत. अशामध्येच सोशल मीडियावरील एक फोटोमध्ये काही युवक हातात पाकिस्तानी झेंडा घेऊन उभे आहेत. सोबतच आम्हाला काश्मीर नको विराट कोहली पाहिजे, अशा आशयाचा एक बॅनर झळकवत आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोला मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहे.
https://twitter.com/Ibne_Sena/status/1140530531399921664
दरम्यान, व्हायरल फोटो एडिट करण्यात आला आहे. मूळ फोटो काश्मीरमधील असून २०१६ मध्ये दहशतवादी बुरहान वाणीचा मृत्यू झाल्यानंतर काही तरुण स्वातंत्र्याची मागणी करत होते. एका वृत्तपत्राने हा फोटो प्रसिद्ध केला होता. आता या फोटोला एडिट करून व्हायरल केला जात आहे.