इंग्लंड विजेतेपदाचा दुष्काळ संपवेल – कुक

सध्याचा इंग्लडचा संघ 1979, 1987 आणि 1992 मध्ये अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या इंग्लंडच्या संघापेक्षा सरस असल्याची अनेक कारणे आहेत आणि हा संघ विश्वचषक स्पर्धा जिंकेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलीस्टर कुकने व्यक्त केले आहे. सद्याचा संघ हा समतोल असून त्यांच्याकडे15 असे खेळाडू आहेत जे अंतिम संघात स्थान मिळाल्यावर सामने एकहाती जिंकून देऊ शकतात. त्यांना त्यांचे संघातील स्थान माहिती आहे आणि दिलेले काम कसे चोख पार पाडायचे याची त्यांना जाण आहे. सध्याच्या संघात वेगवेगळ्या जागेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे हा एक उत्तम एकदिवसीय संघ असून त्यांना खेळताना पाहून आनंद होतो.

इंग्लंडसाठी कसोटी प्रकारात सर्वाधिक धावा करणाऱ्या कुकने विश्वचषकात संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. 2015 सालच्या विश्वचषकाच्या संघातून त्याला अचानक वगळण्यात आले होते. 2015 मधील विश्वचषकाच्या स्पर्धेत इंग्लंडला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. त्यानंतर इंग्लंडच्या संघाने चांगली कामगिरी करताना क्रमवारीत पहिले स्थानही कायम केले आहे. त्याविषयी बोलताना कुक म्हणाला, काही वर्षांपर्यंत इंग्लंड कसोटी क्रिकेट विषयी थोडा जास्त विचार करत होता. पण मागील चार वर्षांपासून एकदिवसीय क्रिकेटकडेही लक्ष्य वाढले आहे, असेही कुक म्हणाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)