भारताला कमी लेखू नका – ग्रमी स्वान

लंडन: आगामी विश्वचषक स्पर्धा 100 दिवसांवर येऊन ठेपली असताना ही स्पर्धा कोण जिंकेल याचे अनेक तर्क-वितर्क लावले जात असले तरी यजमान इंग्लंड आणि भारत विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानले जात आहेत. इंग्लंडचा माजी फिरकीपटू ग्रमी स्वानने इंग्लिश संघाने भारताला कमी लेखु नये, अशी ताकीद देताना विश्वचषक जिंकण्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ मोठा अडथळा असल्याचे एका खजगी वहिनीशी बोलतना सांगितले आहे.

क्रिकेटचा उगम, प्रचार आणि प्रसारात इंग्लंडचे मोठे योगदान असूनही त्यांना एकदाही एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरता आलेले नाही; परंतु 2010 मध्ये झालेल्या टी- 20 विश्वचषकाचे विजेतेपद इंग्लंड पटकाविले होते. त्या विश्वचषकाच्या संघातील ग्रमी स्वान मुख्य खेळाडू होता. सध्याच्या इंग्लंड संघात आणि त्यावेळच्या संघात अनेक सामनाता असल्याने सध्याचा इंग्लंडचा संघ विश्वचषक जिंकू शकतो असे स्वानचे मत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामी स्वान पुढे म्हणाला, तुम्ही भारतीय संघाला पराभूत न करता विश्वचषक जिंकू शकत नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ हा एकदिवसीय प्रकारातील सर्वोत्तम संघांपैकी एक संघ आहे. तर विराट कोहली एक असामान्य खेळाडू आहे. भारताचे सलामीवीर चांगली कामगिरी करत आहेत तर जलदगती गोलंदाज आणि फिरकीपटू कोणत्याही क्षणी बळी घेत सामना फिरवण्याची क्षमता ठेवतात. त्यांच्याकडे काही अष्टपैलू खेळाडू आहेत ज्यामुळे त्यांच्यासंघाची ताकद वाढते.

कट्टर प्रतिस्पर्धी आणि गतवेळचे विजेते ऑस्ट्रेलियाविषयी बोलताना स्वान म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकात काही वेगळेच क्रिकेट खेळतो. त्यामुळे त्यांना विजयाची नेहमीच संधी असते. त्यांची तुलना फुटबॉलमधील जर्मनी संघाशी करता येते. जे नेहमी विश्वचषक जिंकण्याचे प्रबळ दावेदार असतात. ऑस्ट्रेलिया संघाने विक्रमी पाच वेळा विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. 2017 मध्ये इंग्लड येथे झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या पाकिस्तान संघाविषयी तो म्हणाला, जेव्हा पाकिस्तानचा संघ भरात असतो तेव्हा त्यांना हरवणे कठीण असते. विशेषतः त्याचे गोलंदाजी खूपच प्रभावशाली आहेत; परंतु जेव्हा त्यांचे फलंदाज धावा काढू शकत नाहीत आणि गोलंदाजांना अचूक आणि भेदक गोलंदाजी करता येत नाही. तेव्हा त्यांचा खेळ अतिशय सुमार दिसतो. त्यांचा खेळ विशिष्ट पातळीवर नसल्याने त्यांच्याविषयी काही सांगता येत नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)