“शबरीमालाला महिला पत्रकार पाठवू नका’ : हिंदू संघटना

कोट्टायम – शबरीमाला येथील आयप्पा मंदिर दोन दिवसांच्या विशेष पूजेसाठी दुसऱ्यांदा उघडले जाणार आहे. मात्र गेल्या वेळच्या कटू घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी महिला पत्रकारांना शबरीमालाला पाठवू नका, असे महिलांच्या प्रवेशास विरोध करणाऱ्या हिंदू संघटनांनी प्रसिद्धीमाध्यमांना कळविले आहे.

शबरीमाला मंदिरातील 10 ते 50 या वयोगटातील महिलांची प्रवेशबंदी न्यायालयाने रद्द केली. तरी गेल्या महिन्यात मंदिर पाच दिवसांसाठी उघडले तेव्हा आंदोलकांनी या वयाच्या एकाही महिलेला मंदिरापर्यंत जाऊ दिले नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)