चीनला आदेश देऊ नका : जिनपिंग

बिजींग: “चीनने काय करावे आणि काय करू नये, याबाबत कोणीही चीनला आदेश देऊ शकत नाही.’ अशा स्पष्ट शब्दांमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट केली. चीनमध्ये आर्थिक सुधारणा आणि सुधारणावादी धोरणांच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. आपल्या 80 मिनिटांच्या भाषणात जिनपिंग यांनी जागतिक नेत्यांना उद्देशून चीनची भूमिका स्पष्ट केली.

मात्र चीनी सरकारवर कम्युनिस्ट पक्षाची पकड ढिली होण्याचे कोणतेही संकेत त्यांनी आपल्या भाषणादरम्यान दिले नाहीत. चीनमध्ये अमेरिकेतील कंपन्यांना अधिक वाव मिळावा आणि बौद्धिक स्वामीत्वाची चोरी रोखण्यासाठी कठोर उपाय योजना चीनने कराव्यात, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. चीनमधील विकासदर मंदावणे आणि अमेरिकेबरोबरचे व्यापार युद्ध यासारख्या समस्या हाताळण्यासाठी ठोस धोरणे निश्‍चित केल्याचेही जिनपिंग यांनी
नमूद केले नाही.

जिनपिंग यांनी चीनमधील नागरिकांच्या कठोर परिश्रम, ज्ञान आणि धाडसाचे कौतुक केले आणि डेंग शियापिंग यांच्या काळात 1978 साली सुरू झालेल्या सुधारणावादी काळखंडापासून मिळालेल्या यशाचा आढावा घेतला. चीनच्या अर्थकारणाने येत्या काळात संपूर्ण जग आश्‍चर्यचकित होईल. त्यासाठी चीनचा विकास मोजण्याचे कोणतेही नियम अथवा संदर्भग्रंथ नाहीत. चीनचा विकास अन्य कोणत्याही देशाला धोका नसेल, असे दक्षिण चीन समुद्रात चीनच्या लष्करी सामर्थ्याबद्दल बोलताना जिनपिंग यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)