‘युती’त जागा न दिल्याने आठवले संतप्त ! ‘तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल’

नवी दिल्ली: भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. शिवसेना २३ तर भाजप २५ जागा लढवणार आहे.  दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) यांना एक सुद्धा जागा नसल्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रामदास आठवले यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे आणि दोन्ही पक्षांनी या निर्णयावर पुन्हा विचार करावा.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमच्यासोबत संपर्क साधत आहे, परंतु आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहायचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यांनी असेही म्हटले की जर भाजप आणि शिवसेना त्यांना जागा देत नसेल तर त्यांच्या पक्षाला पुढील धोरण विचारात घ्यावे लागेल. महाराष्ट्रात झालेल्या कराराच्या अनुसार बीजेपी २५ आणि शिवसेना २३ लोकसभा लढविणार आहेत. राज्यात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत.

आठवले पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षासाठी एक जागा सुद्धा न सोडण्याची घोषणा फार गंभीर आहे. मी आनंदी नाही. मला राग येतोय. त्यांनी दलित समाजाकडे दुर्लक्ष केले, आरपीआयकडे दुर्लक्ष केले आणि माझ्याकडे दुर्लक्ष केले. याबद्दल दलित समाजातही तीव्र प्रतिक्रिया आहे.”

“२०१४ मध्ये आमच्या पक्षासाठी एक जागा (सातारा) सोडली गेली. मी वारंवार सांगितले की भाजप आणि शिवसेना एकत्र येतील. आता ते एकत्र आले आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु आरपीआयला विसरणे बरोबर नाही. जर आम्हाला एकत्र घेतले नाही तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)