तिघाही खानांच्या यशाची गॅरंटी नाही- कतरिना

गेल्या वर्षी कतरिनाने शाहरुख खानबरोबर “झिरो’ आणि आमिर खानबरोबर “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ सारखे फ्लॉप सिनेमे केले. त्यापूर्वी सलमान खानबरोबर केलेला “रेस 3′ देखील सणकून आपटला होता. वर्षभराच्या अंतराने तिन्ही खानांबरोबर फ्लॉप सिनेमे करण्याचा अनुभव कतरिनाला मिळाला. त्यामुळे तिला आता या तिघांच्या सक्‍सेस गॅरंटीबाबतच शंका वाटायला लागली आहे.

आमीर, शाहरुख आणि सलमान या तिघांबरोबर सिनेमा केला की हमखास हिट होईल, असे आता म्हणता येऊ शकणार नाही. सक्‍सेस गॅरंटी म्हणजे केवळ हिट स्टार कास्ट असणे पुरेसे नाही. असा विचार तर केवळ “मेड इन मिडिया’ असतो. फिल्म मेकिंग हा असा प्रकार आहे, ज्यासाठी अनेक लोक, त्यांचे विचार, त्यांचे ऍप्रोच आणि प्रयत्न एकत्र यावे लागतात. त्यामुळे जर सिनेमाला यश मिळाले, तर त्याच्याचमुळे सक्‍सेस मिळाले आणि जर सिनमा फ्लॉप झाला तर त्याच्याचमुळे फ्लॉप झाला, असे म्हणता येऊ शकणार नाही. आपण कधीही खान तिकडी किंवा हिट स्टार बघून सिनेमे निवडलेले नाहीत. स्क्रीप्टच निवडीचा निकष मानले आहे, असे कतरिना म्हणाली.

कतरिनाने शाहरुखबरोबर 2, सलमानबरोबर 7 आणि आमिरबरोबर 2 सिनेमे केले आहेत. हे सगळेच काही फ्लॉप झालेले नाहीत. त्यातील जे हिट झाले, त्याच्या स्क्रीप्टमध्ये दम होता. अशा वेगळ्या हटके स्क्रीप्टवर काम करण्यासाठी बॉलिवूडमधील प्रियांका, दीपिका, अनुष्का, चित्रांगदा यासारख्या हिरोईनही उत्सुक असतात. त्यांनाही स्क्रीप्टची चांगली जाण आहे. आता स्क्रीप्टच कमजोर असेल, तर ऍक्‍टर्समध्ये खान तिकडीपैकी कोणताही खान असला, तरी सिनेमा फ्लॉपच होणार, एवढे तर समजायला पाहिजेच. कतरिनाला ही बाब लक्षात आलेली दिसत नाही. कदाचित लक्षात येऊनही तिने खान तिकडीबाबतचे आपले मत पक्के बनवून ठेवले असेल. आता तिला चांगल्या स्क्रीप्टवरच्या सिनेमाचे प्रॉडक्‍शन करायचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)