गुढीपाडव्याबाबतच्या अपप्रचाराला बळी पडू नका

कीर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांचे आवाहन

मेढा – आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रतिवर्षी चैत्र शुध्द प्रतिप्रदेला नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभी प्रथा आहे. या मागचा हेतू हा परंपरेप्रमाणे काठीला वस्त्र बांधून नववर्षाचा आनंद व्यक्त करणे हा आहे. संभाजी ब्रिगेडसारख्या घातक संघटनेकडून गुढीपाडवाचा संबंध धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाशी लावून अपप्रचार करत आहे. नागरिकांनी या अपप्रचाराला बळी न पडता गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन सुप्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले.

मेढा, ता. जावळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बंडातात्या म्हणाले, संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर 1689 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही गुढी उभारली नाही. मात्र 1690 पासून परंपरेप्रमाणे पुन्हा गुढी उभी करण्यात आल्या होत्या. गुढीची परंपरा 2000 वर्षांपासूनची आहे. तसेच गुढीवरील पालथा तांब्या आहे, असे जुजबी गुढ्या उभ्याच करू नयेत, असा संदेश सर्वत्र फिरत आहे. वास्तविक हे खोटे आहे. लोकांच्या मनात गुढीबाबत संभ्रम निर्माण करून गुढीपाडवा सणासोबत हिंदू धर्मात कोणतेच सण साजरा होऊ नयेत आणि हिंदू संस्कृतीचा नाश व्हावा, असा उद्देश काही संघटनांचा आहे. अशा घातक संघटनेच्या अपप्रचाराला बळी न पडता गुढीपाडवा उत्साहात साजरा करावा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.

गुढीपाडव्या बाबतच्या अपप्रचारामागे संभाजी ब्रिगेड संघटनेचा हात आहे, मात्र या संघटनेचा हिंदू धर्माशी काहीही सबंध नसून संघटनेचा स्वतंत्र धर्म असून या लोकानी हिंदूच्या सण आणि उत्सवांमध्ये ढवळा-ढवळ का कशासाठी करावी असा प्रश्‍न बंडातात्या या दरम्यान उपस्थित केला. महाराष्ट्रात सध्या जातीय अस्मिता फार टोकदार होऊ लागल्या आहेत. अशातच सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणांची माथी भडकवण्याचे प्रकार सरास सुरू आहेत. अशातच ज्यांना सत्य काय महिती नसते अशांना हे सगळे वाटू लागते व समाजात तेढ निर्माण होते. त्यामुळे अशा मेसेज आणि प्रचाराला बळी न पडता नववर्षाचे स्वागत मोठ्या थाटात आणि उत्साहात करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)