भ्रष्टाचाराला बळी पडू नका :अशोक शिर्के

गोंदवले – समाजातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्यासाठी व त्यांची कामे होण्यासाठी शासकीय निमशासकीय कार्यालया वर अंकुश ठेवण्याचे काम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करतो. भ्रष्टाचार निर्मुलन ही काळाची गरज आहे फक्त भ्रष्टाचाराला बळी पडू नये असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अशोक शिर्के यांनी केले

दहिवडी ता. माण येथिल दहिवडी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल जन्मशताब्दी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी दहिवडी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. बळवंत, प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. टी. एस. माने, प्रा. एन. डी. शिकलगार आदी मान्यवर उपस्थित होते. शिर्के म्हणाले, सर्वसामान्य जनतेची शासकीय कार्यालयातील कामे सुरळीत पूर्ण होण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महत्वपूर्ण भूमिका बजावतो. आपणावर जर अन्याय होत असेल आम्हाला कळवा आपले नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल. यावेळी प्रा. बाबर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. बळवंत यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवा, रडण्याऐवजी लढण्याची कणखर भूमिका ठेवा असे आवाहन केले. एन. डी. दबडे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)