माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवू नका – प्रियंका गांधी-वढेरा 

बुंदेलखंड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने प्रियंका गांधी-वढेरा यांना सक्रिय राजकारणात आणले. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. परंतु, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्याकडून चमत्काराची अपेक्षा करु नये, त्यापेक्षा तुम्ही सर्वांनी बूथ स्थरावर काम करावे, असे प्रियंका गांधी-वढेरा यांनी स्पष्ट केले आहे. बुंदेलखंड येथे कार्यकर्त्यांशी त्या बोलत होत्या.

प्रियंका गांधी-वढेरा म्हणाल्या कि, लोकसभा निवडणुकीत एखाद्या चमत्काराची अपेक्षा ठेवू नका. त्यापेक्षा पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी सर्व मतदारसंघात काम करण्याचा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बूथ स्तरावर मजबूत करण्याची गरज आहे. तुमच्या सहकाऱ्यानेच मी राज्यात पक्षाला मजबूत करु शकते, असेही प्रियांका यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)