स्पर्धेच्या युगात मुलींना शिक्षणात वंचित ठेवू नका 

आळंदी – वाढत्या स्पर्धेच्या युगात मुलींना शिक्षणात वंचित ठेवू नका, शिक्षण देण्यास प्राधान्य देऊन त्यांचे पालन पोषण करत सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्याला गती देण्याची गरज आहे. एनकेटी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिल्या जातात. गरजूंना ऑपरेशन मोफत केली जातील, त्याचा गरजू रुग्णांणी लाभ घ्यावा असे आवाहन आळंदी ज्ञानेश्वरी मंदिराचे प्रमुख समाजरत्न नानजीभाई खिमजीभाई ठक्‍कर ठाणावाला यांनी केले.

असेंब्ली ऑफ गॉड चर्च रेव्हरॅड पास्टर पिंपरी चिंचवड शहर भोसरी ख्रिश्‍चन समाजातर्फे नानजीभाई ठक्‍कर ठाणावाला यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शांतिदूत पुरस्कार देण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास रमेश गजभीम, माजी सरपंच सुवर्णा ठाकरे, समाजसेवक मनोहर दिवाणे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर, हभप मुक्ताजी दादामहाराज नाणेकर, सयोज पाटोळे, अनिल पाटोळे, शैलेश सावतडकर, सुनिल पाटोळे, डी. एस. निकम, जी. बी. गजभीम उपस्थित होते. आळंदीत साळी समाज धर्मशाळेत यानिमित्त त्यांचा सत्कार झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अमित उगले, खजिनदार मनोहर दिवाने, नगरसेवक सागर भोसले, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर रायकर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)